Shiva blessing a devotee bowing down to him
भारतीय संस्कृतीमध्ये, कुठल्याही प्राचीन प्रार्थना स्वतःचे संरक्षण करण्याबद्दल किंवा जीवन चांगले घडवण्याबद्दल नव्हत्या. सर्व प्राचीन प्रार्थना नेहमीच "हे प्रभू, मला नष्ट कर म्हणजे मी तुझ्यासारखा होऊ शकेन" अशा होत्या. म्हणून शिवरात्री, जी महिन्यातली सर्वात काळोखी रात्र आहे, ती प्रत्येक मानवासाठी, त्याच्या मर्यादांच्या पलीकडे जाण्याची, सृष्टीच्या उगमाची अमर्यादता अनुभवण्याची संधी आहे, जी प्रत्येक मानवामध्ये बीजरूपात उपस्थित असते.
महाशिवरात्री - अध्यात्मिक जागृतीची रात्र
महाशिवरात्री ही एक संधी आणि शक्यता आहे, ती विशाल शून्यता अनुभवण्याची जी प्रत्येक मानवाच्या आत आहे, जी सर्व सृष्टीचा स्रोत आहे. एकीकडे शिव संहारक म्हणून ओळखला जातो. दुसरीकडे, तो सर्वात कृपाळू म्हणून ओळखला जातो. तो सर्वात श्रेष्ठ दाता म्हणूनही ओळखला जातो. योग पुराणात शिवाच्या कृपाळू स्वभावाबद्दल अनेक कथा आहेत. त्याचा कृपाळूपणा व्यक्त करण्याची पद्धत अद्भुत आणि त्याचवेळी विचित्र आहे. त्यामुळे महाशिवरात्र ही कृपा ग्रहण करण्यासाठी एक खास रात्र आहे. ही शून्यतेची, जिला आपण शिव म्हणतो, तिची विशालतेची तुम्हाला एका क्षणासाठी तरी जाणीव व्हावी, हीच आमची इच्छा आणि आशीर्वाद आहे. ही रात्र तुमच्यासाठी फक्त जागरणाची रात्र नाही, तर जागृतीची रात्र होवो.
Share with the Devotees
Gaganeshwar Dham
+919359857533
